Monsoon news: चक्रीवादळाचा धोका टळला? हवामान विभागाकडुन महत्त्वाची अपडेट

106
Monsoon news: चक्रीवादळाचा धोका टळला? हवामान विभागाकडुन महत्त्वाची अपडेट
Monsoon news: चक्रीवादळाचा धोका टळला? हवामान विभागाकडुन महत्त्वाची अपडेट

सध्याच्या घडीला गुजरातमध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आणि सोबत तीव्र होणारे चक्राकार वारे अरबी समुद्राच्या दिशेनं सरकले असून पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात ही प्रणाली अधिक सक्रीय होताना दिसत आहे. यामुळे गुजरातवरुन चक्रीवादळाचा धोका टळला आहे. सध्या अरबी समुद्रात असणाऱ्या या वादळाची दिशा दक्षिण पश्चिमेला असल्यामुळं राज्यात मुसळधार नव्हे पण मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. (Monsoon news)

कोकण किनारपट्टीसह विदर्भाला पावसाचा तडाखा बसणार
6 सप्टेंबर रोजी नव्याने कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार असून 6 ते 9 सप्टेंबरदरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला असेल. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे परिणाम दिसणार असून पुढचे चार ते पाच दिवस राज्यातील कोकण किनारपट्टीसह विदर्भाला पावसाचा तडाखा बसणार आहे. (Monsoon news)

तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांसाठी आकाश अंशतः ढगाळ आकाश राहील आणि हलका ते मध्यम पाऊस इथे पडू शकतो. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहून पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Monsoon news)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.