Monsoon News: मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला! विदर्भ अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत

113
Monsoon News: मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला! विदर्भ अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत
Monsoon News: मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला! विदर्भ अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत

राज्याच्या (Konkan) कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि (Marathwada) मराठवाड्यात मान्सूनने (Monsoon News) हजेरी लावली असली तरीही विदर्भात मात्र अद्यापही मान्सून स्थिरावण्याचीच प्रतीक्षा सुरु असल्याचं चित्र आहे. सध्याच्या घडीला देशाच्या दक्षिण भागामध्ये मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग समाधानकारक असला तरीही बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावला आहे. मागील 24 तासांमध्ये मुंबईतही पावसाच्या तुरळक सरी वगळता फक्त ढगांची दाटीच पाहायला मिळाली. (Monsoon News)

पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील, तर काही भागांमध्ये सौम्य मेघगर्जनसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या ठिकाणी हवामान खात्यानं ग्रीन अलर्ट लागू केला आहे. तर, पुणे, नगर, धाराशिव, लातूर, सह संपूर्ण विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.विदर्भाच्या अमरावती आणि चंद्रपूरात मान्सूनने प्रगती केली असतानाच पूर्व विदर्भात मात्र अद्याप त्याने दमदार हजेरी लावलेली नाही. (Monsoon News)

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या दक्षिण पश्चिम मान्सून पुढं सरकण्यास वातावरण अनुकूल असून, जम्मू काश्मीरमध्ये समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचीवर एक पश्चिमी झंझावात सक्रिय असल्याचं सांगण्यात येत आहे. 13 जून रोजी हा विक्षोभ आणि चक्रवात पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत प्रभाव करताना दिसणार आहेत. (Monsoon News)

Skymet या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राचा किनारपट्टी भाग, कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि तेलंगणामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेट समूह, दक्षिण छत्तीसगढ आणि आंध्र प्रदेशपर्यंत हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात, दक्षिण पूर्व राजस्थान या भागांमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Monsoon News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.