बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तसेच पश्चिम किनाऱ्यावरील तटीय द्रोणीय स्थितीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी बऱ्यापैकी बाष्प निर्माण झाले आहे. राज्यासाठी मॉन्सून ट्रफही सक्रीय झाल्याने मंगळवारी राज्यातील सात जिल्ह्यांना मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मंगळवारी पालघर, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच विदर्भात गडचिरोलीत रेड अलर्ट राहील. मुंबई , ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट राहील. यासह सातारा, मराठावडा, औरंगाबाद, जालना आणि विदर्भात चंद्रपूर येथे अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट राहील. रेड अलर्टच्या तुलनेत ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहते.
( हेही वाचा: मुंबईकरांनो, मंगळवारी ‘लेटमार्क’ची तयारी ठेवा! )
Join Our WhatsApp Community