वाढत्या पावसात ‘लॅप्टो’चे रुग्ण वाढण्याची भीती

171
जुलै महिन्यात मुंबईत सतत पावसाचा मारा होत असल्याने मुंबईत लॅप्टोच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. साचलेल्या पाण्यात चालल्याने पाण्यात उंदराचे मलमूत्र असल्यास माणसाला लॅप्टोची लागण होते. सध्या मुंबईत केवळ 5 लॅप्टोच्या रुग्णांवर उपचार सुरु असले तरीही येत्या दिवसांत ही संख्या वाढण्याचीही भीती आहे. पाच वर्षांपूर्वी रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णांना लॅप्टोची लागण झाल्याची प्रकरणे पावसाळ्याच्या सुरुवातीला उघडकीस आली होती.
गेल्या महिन्यात लॅप्टोचे 12 रुग्ण आढळून आले होते. जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत मलेरियाचे 119 तर गेस्ट्रॉचे 176 रुग्ण आढळले. डेंग्यूचे 19 तर हेपेटायटीसच्या 23 रुग्णांची पालिकेच्या आरोग्य विभागाने नोंद केली.
7 ते 9 जुलैच्या कालावधीत 3 लाख 44 हजार 291 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून, 43 हजार 297 डॉक्सी कॅप्सूलचे तर 114 अॅझीथ्रोमायसिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालिकेकडून लेप्टो प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. साचलेल्या पाण्यात जाणे टाळा, स्वतःवरच उपचार करु नयेत,  आरोग्याची तक्रार असल्यास पालिकेच्या दवाखान्यात भेट द्या, अशा सूचना करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.