पुन्हा सोमवारपासून पाऊसधारा

शनिवारपासून पावसाची कमी झालेली संततधार राज्यभरात सोमवारपासून पुन्हा सक्रीय होईल. येत्या चार दिवसांत राज्यभरातील बहुतांश भागांत मान्सूनधारांना जोर येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई आणि ठाण्यात गुरुवारपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सलग तीन दिवस अतिवृष्टी राहील

रायगड आणि रत्नागिरीत सोमवारपासून पाऊस धुमाकूळ घालेल. चार दिवसांपैकी सोमवार-मंगळवार दोन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टीची दाट शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट तर गुरुवारपर्यंत अतिवृष्टीसाठी गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सोलापूर, अहमदनगर आणि जळगाव सोडले तर राज्यात पावसाचा जोर दिसून येईल. नाशकात घाट परिसरात मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारी पुणे, कोल्हापूर आणि साता-यात मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट राहील. पुण्यात मंगळवारनंतर अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, साता-यात सलग तीन दिवस अतिवृष्टी राहील. औरंगाबाद आणि जालन्यात विजेच्या गडगडाटासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. परभणी, हिंगोली आणि जालन्यातही मेघगर्जना आणि विजेच्या कडकडानंतर बुधवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल. लातूरमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही यंदाच्या आठवड्यापासून मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट दिसून येईल. अकोल्यात बुधवारी आणि चंद्रपूर, गडचिरोलीत बुधवारी, गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वर्ध्यात गुरुवारी अतिवृष्टी होईल. विदर्भात अपेक्षित दिवसांत होणा-या अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

(हेही वाचा मुंबईत पुन्हा आढळला ‘बीए व्हेरिएंट’चा रुग्ण, ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here