पनवेल-रायगडमध्ये पावसाची ओपनिंग?

सकाळपासूनच शहरात गडद ढगाळ वातावरण होते. त्यामुळे येथे पावसाची चिन्हे दिसून येत होती. अखेर दुपारपासून पावसाने जोरदार बंटिंग सुरु केली आहे.

यंदा पाऊस वेळेआधीच महाराष्ट्र दाखल होणार आहे, असे वेधशाळेने म्हटले आहे. त्याप्रमाणे पावसाने ३१ मे पासूनच पनवेल-रायगडमध्ये ओपनिंग केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दिवसभर विजांच्या गडगडाटांसह या भागात पावसाचे आगमन झाले आहे.

हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. अजून मान्सून केरळात पोहचला नाही. तो ३ जूनपर्यंत पोहचेल. त्यानंतर तो महाराष्ट्रात येईल. आता जो पाऊस पडत आहे, तो मान्सूनपूर्व पाऊस आहे.
– डॉ. जयंत सरकार, संचालक, मुंबई हवामान खाते

विजांच्या गडगडाटांसह पाऊस!

यंदाच्या वर्षी म्हणावा तितका उन्हाळा कडक नव्हता. पारा नियंत्रणात राहिला, त्यामुळे अनेकांना विशेषतः शेतकरी बांधवाना यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा येईल अशी भीती वाटत होती, मात्र हवामान खात्याने ही शक्यता फेटाळून लावत यंदाचा मान्सून वेळेवर येईल, असे भाकीत केले. मात्र प्रत्यक्षात मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात पनवेल येथे पावसाचे आगमन झाले. ३१ मे रोजी पनवेल भागात विजांच्या गडगडाटांसह पावसाने जोरदार बॅटिंग केली.

(हेही वाचा : पवार-फडणवीस भेटीमागे दडलंय काय?)

वातावरणात गारवा!

सकाळपासूनच शहरात गडद ढगाळ वातावरण होते. त्यामुळे येथे पावसाची चिन्हे दिसून येत होती. अखेर दुपारपासून पावसाने जोरदार बंटिंग सुरु केली आहे. त्यामुळे हा मान्सून पूर्व पाऊस आहे कि प्रत्यक्ष पाऊस सुरु झाला आहे, याचा अंदाज घ्यावा लागणार आहे. असे असले तरी पाऊस झाल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला असून लोकांना काही काळ सुखद अनुभव घेता येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here