आला रे…मुंबईसह उपनगरांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

येणार येणार म्हणत मुंबईकरांना दररोज हुलकावणी देणारा पाऊस अखेर मुंबईत आलाच. मान्सूनपूर्व पावसाच्या सरी गुरुवारी, ९ जून रोजी मुंबईसह उपनगरात कोसळल्या. त्यामुळे मुंबईकरांना आता पावसाची ओढ वाढू लागली आहे. मुंबईतील दादर, वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, सायन, कुर्ला, बोरिवली येथे पावसाच्या सरी कोसळल्या.

ट्रान्स हार्बर लाईन ठप्प

कल्याण-डोंबिवलीकरांना असलेली पावसाची प्रतीक्षा अखेर संपली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने घरी परतणाऱ्या, खरेदीनिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आली. पावसाला सुरुवात होताच दुकानदारानी देखील छत्री, रेनकोट  दुकानाबाहेर विक्रीसाठी काढल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना या पावसामुळे मात्र दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. या पावसामुळे लागलीच ट्रान्स हार्बर लाईनवर उव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर लाईन ठप्प झाली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय आहे.

(हेही वाचा हॉटेलांत आखताहेत ‘पहेलवान’ डावपेच, कोणाला मिळणार धोबीपछाड?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here