Monsoon Update: नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली! ‘या’ दिवशी केरळात दाखल होणार मान्सून

219
Monsoon Update: नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली! 'या' दिवशी केरळात दाखल होणार मान्सून
Monsoon Update: नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली! 'या' दिवशी केरळात दाखल होणार मान्सून

उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्यांसाठी आणि मान्सूनची (Monsoon Update) आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनच्या आगमनाची (Monsoon Update) तारीख समोर आली आहे. नैऋत्य मान्सून यंदा काही दिवस लवकर केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा भारतात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी 15 एप्रिल रोजी मान्सूनचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली होती. (Monsoon Update)

यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला

यंदा मान्सून सामान्य तसेच सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता मात्र, यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Monsoon Update)

दक्षिण अंदमानच्या समुद्रात 19 मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता

मागील वर्षी 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. यंदा 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्वसामान्यपणे मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Monsoon Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.