गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसांत दडी मारून बसलेला पाऊस (Monsoon Update) राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी राज्यात १४ सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने आपली हजेरी लावली. अशातच हवामान विभागाने आता राज्यातील मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे सांगितले आहे. मात्र असं असूनही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण आणि विदर्भात पुढील काही दिवस मुसळधार (Monsoon Update) पाऊस होणार आहे. पुढचे दोन दिवस कोकणातील काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी तर काही भागांमध्ये तुरळक सरी पाहायला मिळणार आहेत. गेल्या २४ तासांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तर विदर्भात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे.
(हेही वाचा – Pankaja Munde : वैद्यनाथ साखर कारखाना GST नोटीस प्रकरण, पंकजा मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…)
मान्सूनच्या परतीचा प्रवास…
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच मंगळवार २६ सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला (Monsoon Update) सुरुवात होणार असून, उत्तर भारतापासून याची सुरुवात होणार आहे. तसेच राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमनच उशिरा झाल्यामुळे त्याच्या परतीचा प्रवासही उशिराने म्हणजेच १०ऑक्टोबरनंतर सुरु होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
थोडक्यात एकीकडे राज्यात सध्या मान्सूनचाच पाऊस (Monsoon Update) सुरु असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे देशाच्या उत्तरेकडे आतापासूनच हवामान बदलण्यास सुरुवात झाली असून, थंडीची हलकी चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community