Monsoon Update : परतीच्या पावसाचा ४८ तासांचा राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.

145
Monsoon Update : परतीच्या पावसाचा ४८ तासांचा राज्यातील 'या' भागांना अलर्ट
Monsoon Update : परतीच्या पावसाचा ४८ तासांचा राज्यातील 'या' भागांना अलर्ट

गणेशोत्सवापासून राज्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार ४८ तासांमध्ये पावसाचे प्रमाण काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढणार आहे. मुंबई, कोकण आणि गोवा किनारपट्टी भागामध्ये समाधानकारक पाऊस पडेल. तर विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. (Monsoon Update)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. कोकण किनारपट्टीसह गोवा, तामिळनाडू केरळ राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं कोकणापासून गोव्यापर्यंत पावसाची हजेरी पायाला मिळणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर भागामध्ये घाटमाथ्यावर धुकं दाटून येईल. तर, काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरी बरसतील. अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या सरींमुळं वातावरणात गारवा जाणवेल. तिथं मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येसुद्धा पावसाची ये-जा सुरुच असेल. असं असताना आता राज्याच्या बहुतांश भागांमधून पाऊस लवकरच काढता पाय घेण्याचीही चिन्हं नाकारता येत नाहीत. (Monsoon Update)

(हेही वाचा : Earthquake in Nepal : भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा विध्वंस; इमारतींचा झाला मलबा )

येथे अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने कोल्हापूरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील निवडक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.