Monsoon Update: मान्सून तळकोकणात ‘या’ दिवशी लावणार हजेरी, हवामान विभागाचा अंदाज

1141
Monsoon Update: मान्सून तळकोकणात 'या' दिवशी लावणार हजेरी, हवामान विभागाचा अंदाज
Monsoon Update: मान्सून तळकोकणात 'या' दिवशी लावणार हजेरी, हवामान विभागाचा अंदाज

शेतकऱ्यांसाठी आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी (Monsoon Update) आनंदाची बातमी आहे. मान्सून (Monsoon 2024 Arrival Date) यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मान्सून महाराष्ट्रातदेखील वेळेवर दाखल होणार (Maharashtra Monsoon Update) असून साधारणपणे 7 जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी राज्यात मान्सून चार दिवस उशीराने म्हणजे 11 जून रोजी दाखल झाला होता. यंदा मात्र 7 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. (Monsoon Update)

पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस

गेल्या वर्षी मान्सून 4 जून रोजी दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मात्र मान्सून 4 दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळात दाखल झाला होता. तर राज्यात 11 जून रोजी मान्सूनचं आगमन झालं होतं. आता यंदा मान्सून दिलेल्या अंदाजाप्रमाणे दाखल होतो का हे पहावं लागेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस दिसेल असं सांगण्यात आलं आहे. (Monsoon Update)

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता

भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होत असून ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यावेळी देशात चांगल्या पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंदी महासागराच्या पट्ट्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्याचा परिणाम नैऋत्य मान्सूनवर होऊन यावेळी देशात सरासरीपक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे असं भारतीय हवामान खात्याने या आधीच सांगितलं आहे. (Monsoon Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.