Monsoon Update: २३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट: मुंबईत समुद्राला येणार भरती; जाणून घ्या पावसाचे काय आहेत अपडेट?

190
Monsoon Update: २३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट: मुंबईत समुद्राला येणार भरती; जाणून घ्या पावसाचे काय आहेत अपडेट?
Monsoon Update: २३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट: मुंबईत समुद्राला येणार भरती; जाणून घ्या पावसाचे काय आहेत अपडेट?

मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक भागात धो-धो पावसामुळे हाहाकार माजला आहे. तर काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच हवामान विभागाकडून मंगळवारी (२३ जुलै) देखील तब्बल २३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत देखील राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon Update)

दरम्यान दुपार पर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास अरबी समुद्राला मोठी भरती येऊ शकते.

अशी असेल भरती  (High Tide/Low Tide)

 भरती– दुपारी – ०१:२९ वाजता – ४.६९ मीटर

 ओहोटी – रात्री – ०७:३८ वाजता – १.६८ मीटर

 भरती – (बुधवारी – दि.२३.०७.२०२४) – मध्यरात्री – ०१:३० वाजता -०४.०७ मीटर

ओहोटी – (बुधवारी – दि.२.०७.२०२४) – सकाळी ०७:१७ वाजता -०.४४ मीटर

त्यामुळे मुंबई महापालिकेने चौपाटी व समुद्रकिनाऱ्यावर विशेषत: मरीन ड्राईव्हवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे.

मंगळवारी कुठे कोणता अलर्ट?

रत्नागिरी, सातारामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट, तर नंदुरबार, धुळे, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. (Monsoon Update)

(हेही वाचा – निवडणुकीकरता देणग्या मिळवण्यासाठी Uddhav Thackeray गटाची उठाठेव; Sanjay Nirupam यांनी केली पोलखोल)

पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

पुढील चार दिवस राज्यातील काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तसेच सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे. नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. (Monsoon Update)

(हेही वाचा – Bombay High Court चा महापालिका आणि पोलिसांना सवाल; म्हणाले, मंत्रालयाबाहेर…  )

गुरुवारीही बरसणार पाऊस

गुरुवारी आणि शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रीतील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस राहू शकतो. तसेच पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यामुळे ४ दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. (Monsoon Update)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.