Monsoon Update: राज्यात काही ठिकाणी पावसाचा हाहाकार! तर मुंबईत पावसाचा जोर कायम; जाणून घ्या राज्यात पावसाची परिस्थिती काय?

184
Monsoon Update: राज्यात काही ठिकाणी पावसाचा हाहाकार! तर मुंबईत पावसाचा जोर कायम; जाणून घ्या राज्यात पावसाची परिस्थिती काय?
Monsoon Update: राज्यात काही ठिकाणी पावसाचा हाहाकार! तर मुंबईत पावसाचा जोर कायम; जाणून घ्या राज्यात पावसाची परिस्थिती काय?

राज्यात मागील दिवसांपासून पावसाचे रौद्रवतार पाहायला मिळत आहे. परिणामी शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र शहरासह खेड्या-पाड्यात मुसळधार पावसामुळे (heavy rain) पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुंबई, पुण्यासह कोकण आणि विदर्भात पावसा

ने सरासरी ओलांडली आहे. राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस झाला आहे. १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक आणि विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतिक्षा आहे. (Monsoon Update)

अतिरिक्त पावसामुळे विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पाणीच पाणी आहे. अनेक ठिकाणी पूर आला असून धरणांचे दरवाजे उघडले आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीचे (Panchganga river) पाणी पातळी 38 फूट आठ इंचावर आले आहे. 39 फुटांवर आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी आहे. (Monsoon Update)

(हेही वाचा –  Joe Biden यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार)

दिवसभर पावसाचा जोर कसा असणार? 

मुसळधार पावसाने कोकणाला (Konkan Monsson Update) झोडपून काढले आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. काजळी नदी 17 मीटरवर, गोदावरी नदी 7 मीटरवर, मुचकुंदी नदी चार मीटरवर तर तर जगबुडी 6.85 मीटरवर आहे. काजळी नदीचे रौद्ररूप अजूनही कायम आहे. कोल्हापूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शेजारी, जाधववाडी येथे २ फूट पाणी आले आहे. यामुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे.

मुंबईत पावसाचा जोर कायम

मुंबईतील अनेक भागांत सोमवारी सकाळी जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात व रस्त्याच्या कडेला पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. ठाण्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील धरणे भरली आहेत.  (Monsoon Update)

(हेही वाचा – Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनाऱ्यात असलेल्या जहाजावरच्या गंभीर आजारी भारतीय नागरिकाला केली तातडीची मदत)

दादर सखल भागात पाणी साचले

दिवसभर मुंबईत (Mumbai Rain Update) पावसाचा जोर कधी कमी, तर कधी जास्त स्वरूपाचा होता. हिंदू कॉलनी, सायन सर्कल, दादर टीटी, गांधी मार्केट परिसरात पाण्याचा निचरा संथ गतीने होत होता. पूर्व उपनगरांतील पोस्टल फॉलनी, कुर्ला रेल्वे स्थानक, गोवंडीतील शिवाजी नगर, चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी तसेच पश्चिम उपनगरांतील अंधेरी सबवे, बीकेसी येथील लायब्ररी जंक्शन येथे पाणी साचले.

धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले 

गडचिरोलीमधून गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट उघडले आहे. त्यातून 3.21 लक्ष क्यूसेक एवढा विसर्ग सुरू आहे. नदीकिनारी गावातील नागरिकांनी विशेषतः सतर्कता इशारा दिला आहे. वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.  (Monsoon Update)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.