Monsoon Update : मुंबईसह कोकण वगळता अन्य शहरे कोरडीच; राज्यात आता थेट ७ सप्टेंबर नंतर पाऊस

212
Monsoon Update : मुंबईसह कोकण वगळता अन्य शहरे कोरडीच; राज्यात आता थेट ७ सप्टेंबर नंतर पाऊस

ऑगस्ट महिनासंपत आला तरीही राज्यातील अनेक शहरं मात्र पावसाच्या (Monsoon Update) प्रतीक्षेत आहेत. तर, सध्या कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक नाही, त्यामुळे येत्या ७ सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकणात व काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक असणार आहे, असे माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात समाधानकारक पाऊस (Monsoon Update) झालेला नाही. त्यातही एल-निनो विकसनाकडे जाणारी शक्यता पाहता, पुढे पावसाची अपेक्षा कोणत्या आधारावर करावी?, असेही खुळे यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी (२४ ऑगस्ट) मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून अधूनमधून श्रावण सरी कोसळत असतांनाच दुसरीकडे उन्हाने मुंबईकर घामाघूम झाले.

(हेही वाचा – ‘चंद्रयान’च्या यशानंतर आता ISRO लॉन्च करणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे स्पेस मिशन)

खरीपाची पिके धोक्यात

केवळ पावसावरच (Monsoon Update) अवलंबून असणाऱ्या खरीप हंगामातील सध्याची उभी पिके आता माना टाकत आहेत. या पिकांना पाण्याची खूप गरज आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. काही ठिकाणी शेतकरी पिकांवर रोटवेटर मारण्याच्या मनस्थितीत आहेत. निसर्ग आहे, आणि कधीतरी पाऊस होईलच, ह्या आशेवर, खरीपात हिरमोड झालेले शेतकरी पुन्हा रब्बी हंगामाचा ‘ श्री गणेशा ‘ करण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा आता रब्बी हंगामातही अशा क्षेत्रात जपूनच पावले टाकावी लागतील असे खुळे म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.