गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार (Monsoon Update) पावसाने हजेरी लावली होती. या सततच्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे काही भागांतील जनजीवन देखील विस्कळीत झाले.
दरम्यान, राज्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर (Monsoon Update) कमी झाला आहे. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.अशातच आता पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे.
(हेही वाचा – प्राथमिक शाळांमध्ये शिकवले पाहिजे Good Touch, Bad Touch; व्हिडिओ होतोय व्हायरल)
पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून म्हणजेच शुक्रवार, ११ ऑगस्टपासून राज्यात पावसाच्या (Monsoon Update) हलक्या सरी बरसतील. तर मंगळवार १५ ऑगस्टनंतर राज्यातील पाऊस पुन्हा वाढेल.
तर दुसरीकडे शुक्रवार ११ ऑगस्ट ते रविवार १३ ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात (Monsoon Update) हलक्या सरी कोसळणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community