गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस (Monsoon Update) राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्यात १४ सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार आता गुरुवारपासून म्हणजेच १४ सप्टेंबरपासून राज्यातील अनेक भागांत रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अशातच हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मान्सून सक्रीय होण्यासाठी पूरक वातावरण
पुणे जिल्ह्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Monsoon Update) व्यक्त केली गेली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची तीव्रता वाढली आहे. तसेच दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस पूरक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
(हेही वाचा – Asia Cup 2023 : चुरशीच्या लढतीत पाकिस्तानला २ गड्यांनी हरवत श्रीलंकन संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत)
‘या’ भागात पावसाचा अलर्ट
पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Monsoon Update) दिला आहे. तर उर्वरित विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील एकूण २४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट दिला आहे. यामुळे आगामी चार दिवस पावसाचा अलर्ट (Monsoon Update) कायम राहणार असून मुंबई, पुणेसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community