महिन्याभराच्या सुट्टीनंतर राज्यात पावसाचे (Monsoon Update) पुनरागमन झाले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अशातच राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने (Monsoon Update) राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. आज (सोमवार, ४ सप्टेंबर) विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मात्र पुण्यात आणि मुंबईमध्ये आज म्हणजेच सोमवार ४ सप्टेंबर रोजी पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
(हेही वाचा – IND vs NEP : पाऊस पुन्हा उत्साहावर पाणी फेरणार; नेपाळविरुद्धचा सामना रद्द झाला तर काय होणार?)
3 Sept,6.15 pm, Active monsoon☔🌧 conditions over pats of Telangana Odisha,Coastal Andhra,N TamilNadu, interior of #Maharashtra includes Marathwada, South Madhya Mah, parts of Vidarbha & adj areas.
These rains will surely help farmers & its likely to cont for few more days.
❤☔ pic.twitter.com/FFwoFp9Lz9— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 3, 2023
दरम्यान पुढील ३ दिवस (मंगळवार, बुधवार आणि गुरुवार) पुण्यात मुसळधार (Monsoon Update) पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पुढचे ३ – ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ७ सप्टेंबरपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावेल अशी शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत आणि या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत, ५ सप्टेंबर मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस (Monsoon Update) कायम असण्याची शक्यता आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community