गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला पावसाची (Monsoon) प्रतीक्षा होती. मात्र आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. आजपासून म्हणजेच शुक्रवार २३ जूनपासून भारतात पावसाचे आगमन होत आहे. हवामान खात्याकडून तसा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे तर येत्या २६ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रात पावसाचे आगमन
महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात पाऊस (Monsoon) होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. आज (२३ जून) राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. २४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(हेही वाचा – Curfew In Mumbai : मुंबईत २७ जूनपर्यंत जमावबंदी; मोर्चे, मिरवणुकांना प्रतिबंध)
देशातील ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता
उत्तराखंडमध्ये २६ जूनपर्यंत, हिमाचल प्रदेशात २३ आणि २४ जूनला पाऊस पडू शकतो. २२ आणि २५ जून रोजी पश्चिम बंगाल, २३ आणि २६ जून रोजी ओडिशा, २३ आणि २६ जून रोजी किनारी कर्नाटक, २५ आणि २६ जून रोजी उत्तर अंतर्गत कर्नाटक, २२ – २४ आणि २६ जून रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे पावसाची (Monsoon) शक्यता आहे.
बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्येही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सध्या बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा फटका बसल्यामुळे अनेाकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर काहींना आपला जीवही गमवावा लागला. आता २२ ते २३ जूनपर्यंत बिहारमध्ये पाऊस (Monsoon) पडण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community