यंदाच्या उन्हाळ्यात रेकॉर्ड तोड पारा उंचावल्याने भारतीयांना अक्षरशः नको नकोसे झाले, त्यामुळे चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या भारतीयांसाठी हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. मान्सून (Monsoon) येत्या २४ तासांतच भारतीय सीमेमध्ये प्रवेश करणार आहे, गुरुवार, ३० जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर तो एक एक करत राज्यात प्रवेश करणार आहे.
केरळात आधीच मुसळधार पाऊस (Monsoon) आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. केरळात प्री मान्सून लवकरच मान्सून पावसात बदलेल असे IMD ने म्हटले आहे. IMD ने कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात रेड अलर्ट आणि ३ राज्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Monsoon) कोसळत आहे. दक्षिण पश्चिम मान्सून १ जूनच्या आसपास केरळात प्रवेश करतो. त्यानंतर तो उत्तरेच्या दिशेने जातो. १५ जुलैच्या आसपास संपूर्ण देशात पाऊस पडतो. त्याआधी २२ मेपासून अंदमान निकोबार येथे पावसाने धडक दिली आहे. यंदा सामान्यपणे ३ दिवस आधीच म्हणजे १९ मे रोजी अंदमानमध्ये मान्सूनच आगमन झाले आहे.
(हेही वाचा Jitendra Awhad यांच्याकडून डॉ. आंबेडकरांचा अवमान; सर्व स्तरातून होतोय निषेध; फौजदारी कारवाईची मागणी)
कोणत्या राज्यात कधी येणारे पाऊस?
- केरळ, तामिळनाडू – ३० मे
- कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसामच्या काही भागात – ५ जून
- महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या वरच्या बाजूस, पश्चिम बंगाल – १० जून
- गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहार – १५ जून
- गुजरात, मध्य प्रदेशातील काही भागात, उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यात – २० जून
- गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर – २५ जून
- राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब – ३० जून
- राजस्थान – ५ जुलै
काही दिवसापूर्वी हवामान विभागाने मान्सूनबाबत एक अहवाल दिला होता. या अहवालानुसार, देशात एल निनो प्रणाली कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. मान्सून वेळेपूर्वी भारतात येऊ शकतो. यावर्षी चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, हे मान्सूनसाठी सकारात्मक संकेत आहेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community