कडाक्याच्या उन्हात तापून गेल्यावर अधूनमधून पावसाच्या सरी पडून काही क्षण गारव्याचा आनंद घेणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना नंतर मात्र आणखी कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. एकतर उन्हाळाच राहू दे, नाही तर पावसाळा सुरु होऊ दे अशी विनवणी नागरिक वरुनराजाला करू लागले आहेत, ऊन-पावसाच्या खेळाला कंटाळलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर पावसाळा सुरू होणार आहे. केरळात तो रविवारी, ४ जूनला दाखल होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही सुखदायक बातमी आहे.
मान्सून केरळमध्ये रविवारी दाखल होण्याची शक्यता असून 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचलेले र्नैऋत्य मोसमी वारे पुढे-पुढे सरकत आहे. हे वारे दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांतही पोहोचले आहे. तसेच श्रीलंका, मालदीव आणि कोमोरीनचाही बरासचा भाग या वाऱ्याने व्यापला आहे. यामुळे रविवारी केरळमध्ये मान्सून पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र महाराष्ट्राला अद्याप मान्सूनची प्रतिक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे हवामानातही सातत्याने बदल होताना दिसत आहे. परिणामी कधी पाऊस तर कधी ऊनही पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनला अद्याप प्रतिक्षा असली तरी, राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, आदी भागांत मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला आहे.
(हेही वाचा Odisha Train Accident : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ओडिशा दौऱ्यावर; जखमींची करणार चौकशी)
Join Our WhatsApp Community