दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील विदर्भात नोव्हेंबरनंतरच (Weather Forecast) किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात (Vidarbha ) डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या आठवडाभरापासून राज्यभरातच वातावरणात पूर्णपणे बदल झाला आहे. विदर्भातदेखील पहाटे आणि रात्रीच्या सुमारास हवेत गारठा जाणवण्यास सुरुवात झाली आहे, तर दिवसा मात्र अजूनही उन्हाचे चटके जाणवत आहेत. शहरातील प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्यात गुलाबी थंडी राहणार असून उत्तरार्धात थंडीचा जोर वाढणार आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यभरातच थंडीचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज पाच दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला होता. विदर्भातदेखील हीच परिस्थिती कायम असणार आहे.
(हेही वाचा – Piracy : चित्रपट उद्योगाला ‘पायरसी’चे ग्रहण; वर्षाला होतेय ‘इतक्या’ कोटींचे नुकसान )
दिवाळीत कडाक्याची नाही, तर गुलाबी थंडी अपेक्षित आहे. त्यानंतर मात्र थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. १५ डिसेंबरनंतर गारठ्यात वाढ होईल आणि किमान तापमानाचा पारा १० अंशापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे. १५ जानेवारीपर्यंत अधूनमधून थंडीच्या लाटा येतच राहील. नागपूर तसेच विदर्भात आजपर्यंत अनेकदा किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिला आहे. यावेळीही तो कमीच राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community