लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांनो, मासिक पास एक्स्प्रेसमध्ये चालणार नाही…

107

रेल्वे प्रशासनाने मासिक पास सुरू केले आहेत. मात्र हे मासिक पास विशेष रेल्वे गाड्यांसाठी लागू नाहीत. त्यामुळे मासिक पास घेतल्यानंतरही विशेष गाड्यांनी प्रवास करता येत नाही, असे वास्तव आहे. मेमू ट्रेनसाठी मासिक पास लागू असेल, अशी नियमावली जारी करण्यात आली आहे.

अमरावती, बडनेरा येथील रेल्वे स्थानकावरून दरदिवशी 33 गाड्यांची ये-जा सुरू असते. कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० मध्ये रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मध्यंतरी श्रमिक ट्रेन सुरू करून कोरोनात अडकलेल्या परप्रांतीय कामगार, मजुरांना त्यांच्या मूळगावी परत पाठविले होते. त्यानंतर ‘मिशन बिगेन’ अंतर्गत सर्व काही सुरू करण्यात आले. त्यानंतर रेल्वेने काही महत्त्वाच्या ठिकाणी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या असून, आता यात वाढ करण्यात आली बहुतांश मार्गावर विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत. मेल, एक्स्प्रेस गाड्या दरदिवशी धावत असताना आता यात वाढ करण्यात आली मासिक पासधारकांना या गाड्यांमध्ये ‘नो एन्ट्री’ आहे. त्यामुळे नागपूर, वर्धा, अकोला, मूर्तिजापूर येथे दररोज ये-जा करणाऱ्या मासिक पासधारकांना रेल्वेने प्रवास कसा करावा, हा सवाल उपस्थित होत आहे.

(हेही वाचा ‘बेस्ट’च्या मार्गावर एसटी, कारण…!)

एक्स्प्रेसला कधी सुरू होणार

बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावरून दर दिवशी ३२ ते ३३ एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा सुरू असते. मात्र, या एक्स्प्रेसमध्ये मासिक पासधारकांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पासधारकांना एक्स्प्रेसमध्ये कधी प्रवास मिळणार, अशी मागणी होत आहे. एक्स्प्रेसमध्ये पासधारकांना प्रवास नसल्याने पास कुचकामी ठरत आहे.

पासवर मेमू ट्रेनमध्येच प्रवासाची मुभा

रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार मेमू ट्रेनमध्येच पासधारकांना प्रवास करता येतो. पास धारकांना तूर्त एक्स्प्रेसमध्ये प्रवास मनाई आहे. कर्मचारी नियमांचे पालन करत असल्याचे अमरावती रेल्वे स्थानक प्रबंधक महेंद्र लोहकरे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.