‘धूळ’ हा दोन अक्षरी शब्द. प्रदूषणापासून एखाद्याला कमी लेखण्यापर्यंत दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला जातो, मात्र या धुळीचे मोल सोन्यापेक्षाही जास्त आहे, असे म्हटले तर कोणाच्याही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
जगातील सर्वात महागडी धूळ ही पृथ्वीवरील नसून चंद्रावरील आहे. या धुळीला मून डस्ट (Moon Dust) असे म्हणतात. या धुळीचा लिलाव न्यूयॉर्क येथील बोनहाम्समध्ये झाला होता. तिथे या धुळीला सुमारे ४ कोटी रुपयांची किंमत मिळाली. या धुळीला लिलावाआधी ८ ते १२ लाख रुपये मिळती, असा अंदाज लावण्यात आला होता. ही धूळ चंद्रावर पहिल्यांदा उतरणारे नील आर्मस्ट्रॉंग यांनी तिथे पोहोचल्यावर उचलली होती. ‘अपोलो ११’ शी संबंधित आहे.
(हेही वाचा – Ajit Pawar : वाचाळवीर नेत्यांनी भान ठेवावे, अजित पवार यांचा टोला)
चंद्रावरील धूळ असल्याने ती पृथ्वीवर आणणेही कठीण काम असते. केवळ तीन देशांकडेच अशी चंद्रावरील धूळ आहे. ‘नासा’ने आपल्या अपोलो मोहिमांमध्ये चंद्रावरील धूळ आणि खडकांचे ३८२ किलो नमुने गोळा केले होते. सोव्हीएट संघाने आपल्या तीन मोहिमांमध्ये केवळ तीनशे ग्रॅम धूळ गोळा केली होती. चीनही चंद्रावरील धूळ पृथ्वीवर आणणाऱ्या देशांपैकी एक देश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community