पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील खरीप हंगामात शिरूर तालुक्यातील मूग व बारामती तालुक्यातील बाजरी ही मुख्य पिके म्हणून निश्चित करण्यात आली. यामुळे या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांना या पिकांच्या पीक विमा रकमेपैकी २५ टक्के रक्कम नुकसानभरपाई म्हणून दिली जाईल. यासंदर्भातील अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढली.
मूग पिकाकरिता विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी २० हजार रुपये, तर बाजरीसाठी प्रति हेक्टरी २४ हजार रुपये इतकी आहे. यापैकी २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळू शकेल.अपुरा पाऊस, हवामानातील अन्य घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शिरूर तालुक्यातील महसूल मंडळाच्या चार आणि बारामती तालुक्यातील तीन गटांमधील पिकांसाठी नुकसान भरपाई देण्यात येईल.शिरूर तालुक्यातील मूग,तर बारामती तालुक्यातील बाजरी हे मुख्य पीक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community