मुरादाबादच्या (Moradabad) सोनापूर गावात दहावीच्या विद्यार्थीनीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेली ही मुलगी शाळेची पुस्तके खरेदी करण्यासाठी घराबाहेर गेली ते अद्याप परत आलेली नाही. तिच्या कुटुंबियांनी मुस्लिम तरुण दिलशादविरुद्ध (Dilshad) एफआयआर दाखल केला असून आरोप केला आहे की, त्याने त्यांच्या मुलीचे अपहरण केले आहे. (Moradabad)
( हेही वाचा : दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य; Aditi Tatkare यांचे विधान)
कुटुंबियांचा लव्ह जिहादचा आरोप
पीडित मुलीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, दिलशाद (Dilshad) त्यांच्या मुलीला शाळेत जाताना वारंवार त्रास देत असे. त्यात दिलशाद ही मागील काही दिवसापासून बेपत्ता आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पण अद्याप कोणाचाही सुगावा लागलेला नाही. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि लव्ह जिहादचा (Love jihad) आरोप केला आहे. तसेच मुलगी सापडली नाही कर निदर्शेने करू अशा इशारा हिंदू (Hindu) संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.(Moradabad)
ही आधीच्या घटनेची पुनरावृत्ती
दरम्यान गावकऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, दिलशादता चुलत भाऊ एका हिंदू (Hindu) मुलीसोबत पळून गेला होता. नंतर मुलीने इस्लाम (Islam) धर्म स्वीकारला आणि त्यांच्याशी निकाह केला. सध्या ती मुलगी गावतच राहते. त्यामुळे पुन्हा असाच काहीसा प्रकार दिसतोय, असे गावकऱ्यांचे म्हणणे असून तणावाचे वातावरण गावात निर्माण झाले आहे. (Moradabad)
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे आणि ते दिलशादला (Dilshad) शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु पोलिसांना अद्याप कोणतेही माहिती मिळालेली नाही. गावात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.(Moradabad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community