अग्निशमन दलासाठी ‘अधिक संरक्षित’ गणवेष!

163

मुंबईत आगी सारख्या दुर्घटना तसेच कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडल्यास अग्निशमन दलाचे कर्मचारी कायम तत्परतेने सेवा पुरवतात. प्रसंगी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य केले जाते. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून पालिकेने महत्तवपूर्ण निर्णय घेतला आहे. अग्निशमन दलातील जवानांसाठी पालिकेने वैयक्तिक स्तरावर अधिक संरक्षित असा गणवेष पुरविण्याचे ठरविले आहे. पाश्चात्य, विशेषत: युरोपियन दर्जा असलेला गणवेष आग विझवताना जवानांसाठी संरक्षक ठरणार आहे.

आगीचा प्रतिकार करणे शक्य

पालिकेने २०१७ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेष विकत घेतले होते. त्याची मुदत संपणार असल्याने पालिकेकडून नवे गणवेश खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी १६ कोटी १९ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. या नव्या गणवेशामुळे आग विझवताना संपूर्ण शरीर झाकले जाणार असून आग विझवताना कमी इजा होईल. तसेच, आग विझविताना या गणवेषाच्या आधारे आगीचा अधिक काळ प्रतिकार करणे शक्य होणार आहे.

(हेही वाचा : पुरातन वास्तू आणि पुतळेही चमकत राहणार )

युरोपीय गणवेशाला पसंती

पालिकेकडून पाश्चात्य युरोपीयन गणवेषाला पसंती देण्यात आली आहे. यात जवानांना उपयुक्त ठरणारे जॅकेट, ट्राउझर, हूड फायरमन, हातमोजे यांचा समावेश असणार आहे. गणवेषाच्या दर्जाची खरेदी करताना त्रयस्थ संस्थेकडून तपासणी केली जाणार आहे. या खरेदीसाठी जॅकेटसाठी ७ कोटी ७२ लाख, ट्राऊझरसाठी ५ कोटी ८० लाख, हूड फायरमनसाठी ६३ लाख १५ हजार, हात मोज्यांसाठी १ कोटी ५० लाख रुपये एवढा खर्च येणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.