EWS scheme : आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत ‘इतक्या’ जणांना मिळाला लाभ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन महामंडळाच्या कामकाजाविषयी आढावा घेऊन सविस्तर चर्चा केली.

102
EWS scheme : आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत 'इतक्या' जणांना मिळाला लाभ
EWS scheme : आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत 'इतक्या' जणांना मिळाला लाभ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून आतापर्यंत २३ हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा व्याज परतावा देण्यात आला आहे. यापुढे लाभार्थ्यांनी व्याज परताव्याचा दावा केल्यानंतर सात दिवसाच्या आत व्याज परताव्याचा लाभ देण्याकरिता महामंडळांनी कार्यपद्धतीचे कालबद्ध नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. (EWS scheme)

बुधवारी सकाळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन महामंडळाच्या कामकाजाविषयी आढावा घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, संबंधित अधिकारी उपस्थित होते. (EWS scheme)

मंत्री पाटील म्हणाले, १७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत व्याज परताव्यासाठी दाखल झालेली सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. आतापर्यंत ५५४ कोटी पेक्षा अधिक व्याज परतावा अर्थसहाय्य मराठा समाजाकरिता देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत महामंडळाकडे व्याज परताव्याचे एकही प्रकरण प्रलंबित नाहीत. (EWS scheme)

(हेही वाचा – Diwali Bonus : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट)

एका दिवसात ६ हजार जणांना मदत
  • बुधवारी सकाळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ६ हजार लाभार्थ्यांना ४.६५ कोटी रुपयांचा व्याज परतावा ऑनलाईन स्वरुपात वितरीत करण्यात आला. (EWS scheme)
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजनांना सर्वोत्तम प्रतिसाद मिळत असून या योजनांच्या माध्यमातून राज्यभरात जवळपास ७० हजार पेक्षा जास्त अधिक मराठा उद्योजक तयार झाले आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस चालना मिळत आहे. या योजनेसाठी राज्य शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. (EWS scheme)
  • मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. (EWS scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.