RTE च्या २६ हजारांहून जास्त जागा रिक्त; अद्याप पाचवी प्रतीक्षा यादी जाहीर नाही

25

शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतरही अद्याप २६ हजार ८७० जागा रिक्त आहेत. चौथ्या प्रतीक्षा यादीनंतर प्रवेश प्रक्रिया थंडावली आहे. जागा रिक्त असूनही पाचवी प्रतीक्षा यादी जाहीर न झाल्याने पालक नाराजी व्यक्त करीत आहेत.

(हेही वाचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दिवाळी अंक आला; Raj Thackeray यांच्या हस्ते प्रकाशन)

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविते. राज्यातील ९ हजार २१७ शाळांमधील एक लाख पाच हजार २४२ जागांसाठी दोन लाख ४२ हजार ५१६ अर्ज आले. ऑनलाइन सोडतीत ९३ हजार नऊ विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग खुला करून देण्यात आला. ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९’ (RTE) नुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांवरील निवड यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा मार्ग खुला झाला. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील प्रवेशाच्या चार याद्या जाहीर झाल्या आहेत. मात्र जागा रिक्त असल्याने पालक अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु प्राथमिक शिक्षण विभागाने अद्याप पाचवी प्रतीक्षा यादी जाहीर न केल्याने पालक नाराजी व्यक्त करत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.