मुंबईत परिपूर्ण लसवंतांचा आकडा ५० लाखांच्या पार

परिपूर्ण लसवंतांचा ५० लाखांचा हा आकडा मुंबईने शुक्रवारी पार केला.

134

देशात १०० कोटी लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले जात असतानाच, मुंबईतही १ कोटी ३७ लाख ३४ हजार १६४ लसीकरण पार पडले आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन्ही लस घेतलेल्या परिपूर्ण लसवंतांची संख्या ही ५० लाखांपार झाली आहे. परिपूर्ण लसवंतांचा ५० लाखांचा हा आकडा मुंबईने शुक्रवारी पार केला.

मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आजतागायत मुंबईत एकूण १ कोटी ३७ लाख ३४ हजार १६४ लसीकरण पार पडले आहे. यामध्ये ८७ लाख २ हजार ५८९ लोकांनी पहिला डोस, तर ५० लाख ३१ हजार ५७५ लोकांनी दुसरा डोस घेत सेफ झोनचा पल्ला गाठला आहे.

(हेही वाचाः १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण! देशभर ‘असे’ होतेय सेलिब्रेशन!)

अशी आहे लसीकरणाची स्थिती

मुंबईत झालेल्या एकूण १ कोटी ३७ लाख ३४ हजार १६४ लसीकरणांमध्ये आरोग्य विभाग आणि फ्रंटलाईन वर्करची संख्या ७ लाख ५१ हजर ९१८ एवढी आहे. तर ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या २०लाख २९ हजार ४२२ एवढी आहे. ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींचे ३४ लाख ४५ हजार २७७ इतके लसीकरण पार पडले आहे. याशिवाय १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची संख्या ही ७३ लाख ३९ हजार ११९ एवढी आहे. स्तनदा महिलांच्या लसीकरणाची संख्या १२ हजार ४१५ असून, २ हजार ५३१ गरोदर महिलांचे लसीकरण पार पडले आहे. बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांच्या लसीकरणाची संख्या ही ३१ हजार २०९ एवढी आहे. तर गतिमंद आणि अपंगांमधील लसीकरणाची संख्या ही ६ हजार ३९४ एवढी आहे. याशिवाय अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणाची संख्या ही ७ हजार ९१६ एवढी आहे.

(हेही वाचाः वन अविघ्न पार्क अग्नितांडवः मॉक ड्रील होऊनही उडाला गोंधळ! चूक कोणाची?)

आतापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये कोविशिल्डचे १ कोटी २३ लाख ५८ हजार २०१ एवढे डोस दिले गेले. तर कोव्हॅक्सिनचे १३ लाख २३ हजार ५१७ डोस आणि स्पुतनिक-पाच या लसीचे ५२ हजार ४४६ लोकांना डोस देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.