राज्यात लसीच्या पहिल्या डोसचे ७ कोटींहून अधिक मानकरी

गुरुवारी राज्यातील लसीकरण मोहिमेत ७ कोटींहून अधिक जणांनी पहिला डोस पूर्ण केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. पहिला डोस ७ कोटींहून अधिक जणांनी घेतल्याने ही कामगिरी करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. लसीकरण मोहिमेत मुंबईलाही कौतुकाची थाप मिळाली आहे.

आरोग्य विभागाची माहिती

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ६ लाख ३४ हजार ७६० जणांचे, राज्यभरातील विविध भागांत लसीकरण पूर्ण झाले. तर पहिला डोस घेणा-याची संख्या ७ कोटी १ लाख १८ हजार २५९ वर गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मुंबईत आतापर्यंत १ कोटी ५५ लाख ३ हजार ९२१ लसींचा डोस पूर्ण करण्यात आला आहे. ९३ लाख १ हजार २७५ मुंबईकरांनी पहिला डोस घेतला, तर ६२ लाख २ हजार ६४६ मुंबईकरांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. असेही, आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

( हेही वाचा : ‘या’ दोन मेट्रो मार्गांसाठी एकच कारशेड )

लसीकरण महत्वाचे

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नसून, महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे लसीची पहिली मात्रा पूर्ण झालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे विनम्र आवाहन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here