बापरे! राज्यात ९० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण बाकी

97

कोरोनाच्या लसीची एक मात्रा घेतल्यावर समाधान बाळगून दुसरी मात्रा घेण्याकडे पाठ फिरवणाऱ्यांची संख्या आता कोटीच्या घरात पोहचली आहे, राज्यात अशा ९० लाखांहून अधिक नागरिकांचा समावेश आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण ४१ टक्के आहे. तर पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे.

लसीकरणाचे प्रमाण कमालीचे घटले

कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या अवताराने जगात दहशत निर्माण केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार आता दारात जाऊन लस देऊ लागले आहे, असे असतानाही राज्यात अजूनही ९० लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. राज्यात दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण ७ लाख ६० हजार ९५५, ऑक्टोबर महिन्यात ५ लाख २५ हजार १२१ वर तर नोव्हेंबर महिन्यात ४ लाख ६३ हजार ३८९ वर आले आहे.

(हेही वाचा चिंता वाढली! आफ्रिकेतून मुंबईत ४६६ प्रवासी आले)

दुसरा डोस आवश्यक 

लसीच्या पहिल्या डोसमुळे संरक्षण मिळते, मात्र दुसरा डोस घेतल्यास आजार गंभीर स्थितीला जात नाही. शिवाय, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यताही अत्यल्प असते. राज्यातील लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. दिवाळीनंतर लसीकरणाकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानेही काही लाभार्थी दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, मात्र ही धोक्याची घंटा ठरू शकते. सध्या म्युटेशनमुळे नव्याने धडकलेल्या ओमायक्रॉनचा धोका असताना लसीकरण हाच प्रभावी मार्ग आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.