Defective Medicines : देशभरात आठ हजारांहून अधिक औषधांचे नमुने निकृष्ट; काय सांगतो केंद्र सरकारचा अहवाल

Defective Medicines : २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या औषध तपासणीत सुमारे सात हजारांवर नमुने बोगस, भेसळयुक्त किंवा तत्सम प्रकारचे आढळून आले.

194
Defective Medicines : देशभरात आठ हजारांहून अधिक औषधांचे नमुने निकृष्ट; काय सांगतो केंद्र सरकारचा अहवाल
Defective Medicines : देशभरात आठ हजारांहून अधिक औषधांचे नमुने निकृष्ट; काय सांगतो केंद्र सरकारचा अहवाल

२०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून औषध तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सुमारे ७ हजारांवर नमुने बोगस, भेसळयुक्त किंवा तत्सम प्रकारचे आढळून आले. (Defective Medicines) केंद्र सरकारने एकूण २ लाख ७० हजार ४३१ नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी ८ हजारांहून अधिक नमुने बोगस, भेसळयुक्त होते, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या तपशिलात नोंदवण्यात आले आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : दुसऱ्याच्या कामाचे श्रेय आम्ही घेत नाही; कोस्टल रोडवरून फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका)

जेनरिक औैषध दुकानांमध्ये विकण्यात येणारे औषध हे निम्नदर्जाचे किंवा तपासणीत अप्रमाणित असल्याची तक्रार अनेकांकडून केली जात होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्याला उत्तर देताना आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) हवाल्याने ही माहिती देण्यात आली.

२०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या औषध तपासणीत सुमारे सात हजारांवर नमुने बोगस, भेसळयुक्त किंवा तत्सम प्रकारचे आढळून आले.

औषधांच्या चाचण्यांचा तपशील

वर्ष                तपासणीला दिलेले           निकृष्ट
२०२०-२१         ८४,८७४                       २६५२
२०२१-२२         ८८८४४                        २५४५
२०२२-२३         ९६,७१३                       ३०५३

कठोर दंडाची तरतूद

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड ऑर्गनायजेशन (Central Drugs Standards Organization) यांनी देशातील औषधांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार बनावट आणि भेसळयुक्त औषधांच्या निर्मितीसाठी कठोर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विविध राज्यांनी औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन केली आहेत. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनमध्ये मंजूर पदांच्या संख्येत गेल्या १० वर्षांमध्ये वाढ केली आहे. (Defective Medicines)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.