मुंबईत वड, पिंपळ, उंबराच्या लागवडीवर भर देण्याची महापौरांची सूचना

76

महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्राणी व पक्ष्यांसाठी अंतिम संस्कार स्थळ कार्यान्वित करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या. त्याचबरोबर वड, पिंपळ, उंबर यांच्या लागवडीवर भर देण्यासोबतच पर्यावरण जनजागृतीचा भाग म्हणून महापालिकेच्या एका उद्यानात कारंजावरील लेझर शो आधारित संदेश प्रसारण करण्यात यावे, अशीही महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पार पडलेल्या जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बोलतांना केली.

फ्रान्‍सच्या संस्‍थेच्‍या वतीने प्रमाणपत्र प्रदान

भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील सभागृहात आयोजित जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या या बैठकीला उद्यान व बाजार समितीचे अध्यक्षा प्रतिमा खोपडे, नगरसेविका आशा मराठे, नगरसेविका रुक्साना सिद्दिकी, नगरसेविका ऋतुजा तारी आदी सदस्यांसह केईएम अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, समितीचे सदस्य सचिव तथा उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, समितीचे समन्वयक ज्ञानदेव मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘जैविक वैविध्याने समृद्ध असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जैविक वैविध्याचे आणि पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. हे प्रयत्न सातत्याने अधिकाधिक व्यापक करण्याची गरज आहे, असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले. पर्यावरण व जैव‍िक व‍िव‍िधतेच्‍या संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान व‍िभागाने केलेल्‍या उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल फ्रान्‍सच्‍या (‘ECO-SYS ACTION FOUNDATION’) या संस्‍थेच्‍या वतीने उद्यान अध‍िक्षक जितेंद्र परदेशी यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते. त्‍याबद्दल महापौर क‍िशोरी पेडणेकर यांच्‍या हस्‍ते परदेशी यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

(हेही वाचा नितेश राणेंचा ‘फैसला’ उद्यावर! न्यायालयात कुणी कसा केला युक्तीवाद?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.