भारतात प्रथमच जन्मदरात महिलांनी मारली बाजी!

61

देशासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण-5 ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, देशात आता 1000 पुरुषांमागे 1020 महिला आहेत. यापूर्वी 2015-16 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हा आकडा दर 1000 पुरुषांमागे केवळ 991 महिला इतका होता. यासोबतच जन्मावेळी लिंग गुणोत्तरामध्येही मोठी सुधारणा झाली आहे. ताज्या सर्वेक्षणात हा आकडा वाढून 100 मुलांमागे 929 मुली झाला आहे. 2015-16 च्या आधीच्या सर्वेक्षणात ही संख्या 1000 मुलांमागे 919 मुली एवढी होती.

शहराच्या तुलनेत खेड्यात महिला अधिक 

विशेष म्हणजे एकूण लोकसंख्येतील लिंग गुणोत्तर शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये चांगले आहे. देशातील खेड्यांमध्ये 1000 पुरुषांमागे 1037 महिला आहेत, तर शहरांमध्ये केवळ 985 महिला आहेत. लोकसंख्येतील महिलांचे प्रमाण वाढले असले तरी त्यांच्या शिक्षणाच्या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही.

शिक्षणाच्या बाबतीत अजूनही मागे

आजही देशातील ४१ टक्के महिला अशा आहेत, ज्यांनी दहावीच्या पुढे शिक्षण घेतले आहे. ५९ टक्के महिलांना दहावीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. खेड्यांमध्ये केवळ ३३.०% महिला दहावीच्या पुढे शिक्षण घेऊ शकतात. यासोबतच या युगातही केवळ ३३.३ टक्के महिलांकडे इंटरनेट आहे.

प्रजनन क्षमता कमी

देशात प्रथमच प्रजनन दर 2 वर आला आहे. 2015-16 मध्ये हा दर 2.2 होता. विशेष बाब म्हणजे प्रजनन दर 2.1 हा रिप्लेसमेंट मार्क मानला जातो. म्हणजेच या दरानंतर देशाची लोकसंख्या स्थिर राहते. यापेक्षा कमी दर हे देशाच्या लोकसंख्येमध्ये घट झाल्याचे लक्षण मानले जाते.

 (हेही वाचा: भाजपाची एसटी आंदोलनातून माघार, कामगार मात्र संपावर ठाम! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.