कोविडचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता कोविडच्या रुग्णांची संख्या घटल्याने तसेच निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या, तर काही शाळांनी प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये शाळा भरवण्याऐवजी ऑनलाईन शाळा सुरु करण्यावरच भर दिला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान शाळा बंद होत्या आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन सुरू होते. मात्र कोरोनानंतर पुन्हा एकदा शाळांवर परिणाम झाला आहे आणि तो परिणाम झाला उन्हामुळे…
…म्हणून घेण्यात आला निर्णय
उन्हाचा कडाका वाढत असल्याने आणि दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली. जिल्ह्यात झेडपीच्या २,७९६ शाळा आहेत. त्या शाळांमध्ये एक लाख ५० हजार ३४८ मुले प्रवेशित आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदा शाळा खूपच विलंबाने सुरू झाल्या आहेत.
(हेही वाचा – मुंबईकरांसाठी खुशखबर ‘या’ मेट्रो ट्रेन लवकरच धावणार!)
पालकांनी मुलांना शाळेत पाठविणेच केले बंद
१ फेब्रुवारीपासून शाळा सुरू झाल्या, परंतु आता उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणेच बंद केल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होणार नाही, त्यांची गैरहजेरी वाढणार नाही, याची खबरदारी घेऊन आता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (जिल्हा परिषद) सकाळच्या सत्रात भरविली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community