स्तन कर्करोगाबाबत आली मोठी बातमी… मरणयातनातून सुटका देणार ‘ही’ उपचारपद्धती

महिलांच्या वाढत्या स्तन कर्करोगात परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयातीच्या डॉक्टरांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे. या संशोधनामुळे स्तन कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचल्यानंतरही महिला या जीवघेण्या आजारामुळे होणा-या मृत्यूची संख्या २९ टक्क्यांनी घटली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी स्तन कर्करोगातील चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या स्तन कर्करोगाच्या महिलांना लिग्रोकेन नावाचे इंजेक्शन देऊन त्यांच्यात जगण्याची शक्यता वाढल्याची माहिती सोमवारी, १२ सप्टेंबर रोजी युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलोजी या वैद्यकीय परिषदेत दिली.

कर्करोगाचे निदान झालेल्या ८०० महिलांना अभ्यासासाठी निवडले

कर्करोगासंदर्भात वैद्यकीय अभ्यासांती निकष, नवनवीन संशोधनाबाबत सध्या पॅरिसमध्ये युरोयिन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलोजी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात डॉ. बडवे यांनी स्तन कर्करोगासंदर्भात त्यांच्या ११ वर्षांपासून सुरु असलेल्या संशोधनाची माहिती दिली. लवकर स्तन कर्करोगाचे निदान होत शस्त्रक्रियेची गरज असलेल्या महिलांना लिगोक्लेन इंजेक्शन देणे आणि रुग्णांच्या आरोग्यावरील परिणाम या विषयावर संशोधन केले गेले. डॉ. बडवे यांच्यासह देशातील ११ संशोधकांनी या विषयातील संशोधनात सहभाग घेतला. २०११ ते २०२२ या वर्षांत कर्करोगाचे निदान झालेल्या ८०० महिलांना या अभ्यासासाठी निवडले गेले. या काळात संशोधकांच्या नोंदीत स्तन कर्करोगाचे निदान झालेल्या १६०० महिलांना पहिल्या टप्प्यात निवडले गेले. निदान झाल्यानंतर महिलांना शस्त्रक्रियेची गरज होती. १६०० महिलांपैकी ८०० महिला स्तन कर्करोगाच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यावर होत्या. या महिलांना लिग्नोकेन नावाचे बाजारात अगोदरपासूनच उपलब्ध असलेले भूल देणारे इंजेक्शन दिले गेले. स्तनाच्या कर्करोगाच्या गाठीवरच हे इंजेक्शन दिले गेले. उर्वरित ८०० महिलांना लिग्नोकेन इंजेक्शन दिले गेले नाही. इंजेक्शन न दिलेल्या महिलांना मानांकित उपचार पद्धतीनुसार शस्त्रक्रिया, केमोथेअरपी, हार्मॉन थेरपी, रेडिओथेअरपी दिल्या गेल्या.

(हेही वाचा आशिष शेलारांची गाडी सिल्व्हर ओककडे का वळाली?  )

लिग्नोकेन इंजेक्शन दिल्यानंतर …

लिग्नोकेन इंजेक्शन दिल्यानंतर महिलांना स्तन कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यातील कर्करोगाच्या गाठी पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे दिसून आले. जागतिक स्तरावर अशा प्रकारचा हा पहिला अभ्यास आहे. या अभ्यासामुळे जगभरातील दरवर्षाला एक लाखांपेक्षा अधिक महिलांचा जीव वाचवता येईल. कर्करोगाच्या उपचारपद्धतीतही हा अभ्यास आमूलाग्र बदल घडवून आणेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here