रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. रशियाची (Moscow Terrorist Attack) राजधानी मॉस्कोमध्ये अतिशय भीषण दहशतवादी हल्ला (Moscow Terrorist Attack) झाला असून यामध्ये ७० जणांचा मृत्यू झाला असून तब्बल १५० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ISIS ने स्वीकारली जबाबदारी :
शुक्रवारी, २२ मार्च रोजी संध्याकाळी, काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को (Moscow Terrorist Attack) प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार आणि स्फोट घडवून आणला. मॉस्कोमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस (ISIS) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे.
(हेही वाचा – Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी)
#BreakingNews : रशियाची राजधानी दहशतवादी हल्ल्याने हादरली; हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू तर १५० जण जखमी.
.
.
.#viral #virals #trending #trendingreels #Moscow #CSKvRCB #SmackDown #BootTheScoot #Dictatorship #Hindutshanpost #Marathinews pic.twitter.com/YTWV3MCiyw— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 23, 2024
अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांकडून गोळीबार :
रशियन इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीच्या सूत्रांच्या हवाल्याने टीएएसएसने म्हटले आहे की, अज्ञात बंदूकधारी (Moscow Terrorist Attack) हल्लेखोरांनी क्रोकस सिटी हॉलवर हल्ला केला आणि गोळीबार सुरू केला. स्फोटामुळे इमारतीचे नुकसान झाले आणि आग लागली. प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ल्यात ७० हून अधिक लोक ठार झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी, गुन्हेगारी आणि रशियन तपास समितीचे तज्ञ अंतर्गत व्यवहार मंत्रालय आणि फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसच्या कार्यरत युनिटसह एकत्रितपणे तपास करत आहेत. (Moscow Terrorist Attack)
(हेही वाचा – BMC Property tax: थकीत मालमत्ता कर भरा, नाहीतर कारवाईला सामोरे जा महापालिकेचा कारवाईचा इशारा )
पुढील दोन दिवसांत राजधानीतील सर्व सामूहिक कार्यक्रम रद्द :
क्रॅस्नोगोर्स्क शहरातील आरोग्य विभागाने (Moscow Terrorist Attack) जखमींची यादी जाहीर केली. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, क्राकस सिटी हॉलवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी २ वाजता ८० लोकांना मॉस्कोच्या रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांच्या स्थितीबाबत विभागाने कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी पुढील दोन दिवसांत राजधानीतील सर्व सामूहिक कार्यक्रम रद्द केले आहेत. (Moscow Terrorist Attack)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community