बालविवाह ही वर्षानुवर्षे समाजाला लागलेली वाळवी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असताना देशात अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? असे काही राज्य आहे, ज्या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये १८ वर्षांखालील मुलींचा विवाह करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने परभणी, बीड, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. नुकत्याच समोर आलेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार, राज्यात सर्वाधिक बालविवाह मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत झाले आहे. ही, अत्यंत गंभीर बाब असून या भागातील मुलींच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मराठवाड्यात एकूण विवाहाच्या ५० % मुलींचे विवाह वयाच्या १८ वर्षाखाली होतात.
मूळ कारण वेगळे
सर्वेक्षणानुसार गेल्या २० वर्षात बालविवाहाचे प्रमाण तब्बल २२ टक्क्यांनी घटले जरी असले तरी, परिस्थिती अजूनही गंभीर आहे. मराठवाडा ऊसतोडणी कामगारांचा भाग म्हणून ओळखला जातो. यामुळेच ऊसतोडणी हातभार लागेल, म्हणून लग्न लावले जाते. कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास एक वर्षाच्या आत लग्न लावणे या प्रथेमुळे देखील, अनेक मुली या अनिष्ट प्रथेच्या बळी पडतात. लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात २९ बालविवाह रोखण्यात आले. यामध्ये सर्वाधिक घटना ग्रामीण भागातील होत्या. बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण हवे. युनिसेफच्या २०१९ च्या अहवालानुसार राज्यातील ३५ पैकी सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या १७ जिल्ह्यांत मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांचा समावेश आहे.
(हेही वाचा-100 दिव्यांग लाभार्थींना मिळाले कृत्रिम हात)