बुधवारी पुण्यात राज्यातील सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. अगोदरच कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या पुण्यातच जास्त आढळून येत असताना आता ओमायक्रॉनचे सक्रीय रुग्णही पुण्यातच सर्वाधिक दिसून आले. पुण्यात एका दिवसांत बुधवारी १५८ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले. तर सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता पुण्यात ७४० पर्यंत पोहोचली आहे.
राज्यभरातील एकून ओमायक्रॉन रुग्णांची नवी नोंद
बुधवारी राज्यात २१४ ओमायक्रॉनचे नवे रुग्ण आढळून आले. बुधवारी नव्याने आढळलेल्या २१४ रुग्णांपैकी १०० रुग्णांची नोंद भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने. ६८ रुग्णांची नोंद बी जे वैद्यकीय महाविद्यालयाने, तर ४६ रुग्णांची नोंद राष्ट्रीय कोशिका विज्ञान संस्थेकडून झाली.
(हेही वाचा अरेव्वा…डिस्चार्ज रुग्णांची संख्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा जास्त)
राज्यभरातील ओमायक्रॉनची स्थिती
आता राज्यभरातील ओमायक्रॉनची संख्या दोन हजार पार गेली आहे. ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर दीड महिन्यांनी ओमायक्रॉन रुग्णांची नोंद २ हजार ७४ वर पोहोचली.
जिल्हानिहाय बुधवारी नोंद झालेल्या नव्या रुग्णांचा तपशील –
पुणे शहर – १५८, मुंबई – ६८७, पिंपरी-चिंचवड – ११८ , नागपूरात – ११६, सांगली – ५९, पुणे ग्रामीण – ५६, मीरा भाईंदर – ५२, ठाणे शहर – ५०, अमरावती – २५, औरंगाबाद – २०, कोल्हापूर-१९, पनवेल-१८, सातारा-१४, नवी मुंबई – १३, उस्मानाबाद, अकोला, कल्याण-डोंबिवली येथे प्रत्येकी ११, वसईविरार-७, बुलडाणा-६, भिवंडी-निजामपूर-५, अहमदनगर, नाशिक प्रत्येकी ४, नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया आणि लातूर – प्रत्येकी ३, गडचिरोली, नंदूरबार, सोलापूर आणि परभणी – प्रत्येकी २, रायगड, वर्धा, भंडारा आणि जळगाव प्रत्येकी १ आणि इतर राज्य -१
- आतापर्यंत राज्यात आढळून आलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या – २ हजार ७४
- राज्यातील सक्रीय ओमायक्रॉन रुग्णांची संख्या – ९८३
- आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १०९१