River Pollution : महाराष्ट्रातील सर्वाधिक नद्या आहेत प्रदूषित; मिठीसह कोणत्या नद्या बनल्यात धोकादायक?

302
  • नित्यानंद भिसे

देशभरातील एकूण नद्यांपैकी महाराष्ट्रातील सर्वाधिक ५५ नद्या प्रदूषित (River Pollution) असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्रशासनाने प्रकाशित केला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये धोकादायक पातळी ओलांडलेल्या नद्यांमध्ये मुंबईच्या मिठी नदीचाही समावेश आहे.

मंडळाने यासाठी नद्यांमधील पाण्यातील रसायने, सूक्ष्मजीव ह्यांचा विचार केला. विशेषत: पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण (BOD) किती आहे, ह्यावर पाण्याचे प्रदूषण ठरवण्यात आले. ह्यासाठी के.प्र.नि.मंडळ देशातील नद्यांच्या पाण्याचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासून नद्यांचा प्रदूषित पट्टा / स्थळ ठरवले. यापूर्वी २०१८ मध्ये देशातील प्रदूषित नद्यांचा (River Pollution)अहवाल प्रकाषित करण्यात आला होता, त्यात ३५१ नद्यांचे काही पट्टे (polluted River stretches) प्रदूषित म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता या वर्षी वरील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात देशातील २८ राज्ये आणि ७ केंद्र शाषित प्रदेशातील ६०३ नद्यांपैकी ३११ नद्यांची काही क्षेत्रे प्रदूषित आढळली आहेत. देशात सर्वाधिक प्रदूषित ५५ नद्या महाराष्ट्रात असून त्याखालोखाल मध्यप्रदेश – १९ ,बिहार – १८ ,केरळ – १८, कर्नाटक – १७ राज्यांचा समावेश आहे.

(हेही वाचा Assembly Election 2023 Result : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या ‘विजया’ने ‘ब्रँड मोदी’ मजबूत; 2018 मधून धडा घेतला आणि सत्ता आली)

भारतातील प्रदूषित नद्यांची वर्गवारी

देशातील एकूण प्रदूषित ३११ नद्यांत सर्वाधिक प्रदूषित नद्यांची (प्राधान्य १ ) संख्या ४६, तर प्राधान्य २ मध्ये १६ नद्या आणि प्राधान्य ३ मध्ये ३९ नद्या आहेत. कमी प्रदूषित नद्यांतील प्राधान्य ४ मध्ये ६५ नद्या, तर प्राधान्य ५ मध्ये १४५ नद्या आहेत.

प्राधान्य क्रमानुसार देशात आणि महाराष्ट्रातील नद्यांची संख्या

प्राधान्यक्रम             देशातील नद्यांची संख्या                       महाराष्ट्रातील नद्यांची संख्या

१                               ४६                                                 ०४
२                               १६                                                 ०५
3                               ३९                                                 १८
४                               ६५                                                 १७
५                               १४५                                                ११
एकूण                           ३११                                                ५५

देशातील राज्यवार प्रदूषित नद्यांची संख्या – महाराष्ट्र सर्वाधिक ५५ नद्या

मध्यप्रदेश – १९, राजस्थान – १४, तामिळनाडू – १०, मेघालय – ०७, बिहार – १८, गुजरात – १३, हिमाचल – ०९, ओडीसा – ०७, केरळ – १८, मणिपूर – १३, झारखंड – ०९, छत्तीसगड – ०६, कर्नाटक – १७, प. बंगाल – १३, उत्तराखंड – ०९, गोवा – ०६, उत्तर प्रदेश – १७, आसाम – १०, जम्मू काश्मीर – ०८, पंजाब – ०६, नागालेंड – ०४, आंध्रप्रदेश – ०३, हरियाणा – ०३, मिझोरम – ०३, पॉंडेचेरी – ०३, दिव,दमन – ०१, दिल्ली – ०१, त्रिपुरा – ०१.

महाराष्ट्रातील ५५ प्रदूषित नद्यांची नावे

  • धोकादायक प्रदूषित नद्या – १. मिठी २. मुठा ३. सावित्री ४. भीमा
  • अत्याधिक प्रदूषित नद्या – १. गोदावरी २. मुळा ३. पावना ४. कन्हान ५. मुळा-मुठा
  • मध्यम प्रदूषित नद्या – १. तापी २. गिरणा ३. कुंडलिका ४. दरणा ५. इंद्रावती ६. नीरा ७. घोड ८. क्रिष्णा ९. रंगावली १०. पाताळगंगा ११. सूर्या १२. तितूर १३. वाघुर १४. वर्धा १५. वैनगंगा १६. चंद्रभागा १७. मोरना १८. मुचकुंडी
  • सर्वसाधारण प्रदूषित नद्या – १. भातसा २. पेढी ३. वेल ४. मोर ५. बुराई ६. कलू ७. कण ८. कोयना ९. मंजिरा १०. पेल्हार ११. पेनगंगा १२. वेणा १३. वेण्णा १४. उरमोडी १५. पूर्णा १६. पांझरा १७. सीना
  • कमी प्रदूषित नद्या – १. कोलार २. तानसा ३. उल्हास ४. अंबा ५. वैतरणा ६. वशिष्ठ ७. अमरावती ८. बोरी ९. गोमई १०. हिवरा ११. बिन्दुसारा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.