Mahakumbhmela 2025 : सर्वाधिक दूषित पाणी महाकुंभमेळ्यात; सपा नेत्या जया बच्चन यांचे संतापजनक विधान

Mahakumbhmela 2025 : ज्या भाविकांचा मृत्यू झाला ते मृतदेह थेट पाण्यात फेकण्यात आले, बच्चन यांचा आरोप

51
Mahakumbhmela 2025 : सर्वाधिक दूषित पाणी महाकुंभमेळ्यात; सपा नेत्या जया बच्चन यांचे संतापजनक विधान

महाकुंभमेळ्याच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्या वेळी ज्या भाविकांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले. ज्यामुळे ते पाणी प्रदूषित झाले. आजही विचाराल की, सर्वाधिक दूषित पाणी कुठे तर ते महाकुंभमेळ्यात (Mahakumbhmela 2025) आहे. कारण त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता केली जात नाही, अशी टीका समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी केली आहे.

(हेही वाचा – ४ फेब्रुवारी : Bhimsen Joshi यांचा जन्मदिन; जाणून घेऊया त्यांचा जीवन परिचय)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) सध्या महाकुंभमेळा 2025 (Mahakumbhmela 2025) सुरू आहे. या कुंभमेळ्यात लाखो भाविक श्रद्धेने सहभागी होत आहेत. अशा स्थितीत महाकुंभ आणि पवित्र गंगा नदी यांच्यावर जया बच्चन यांनी केलेल्या टीकेमुळे संताप व्यक्त होत आहे.

२९ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरीची (KUMBH MELA stampede) घटना घडली. यात किमान ३० भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याची सूत्रांनी दिली होती. यानंतर समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जय बच्चन यांनी या घटनेचे राजकारण करत महाकुंभमेळाव्यावर (Mahakumbhmela 2025) टीका केली आहे.

जया बच्चन (Jaya Bachchan) पुढे म्हणाल्या की, मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने पाणी दूषित झाले आहे. हे पाणी लोकांपर्यंत तसेच पोहचते. लोकांचे लक्ष या घटनेकडून विचलित व्हावं म्हणून काळजी घेण्यात आली. मृतदेहांचं शवविच्छेदन होऊ दिले नाही. ज्या भाविकांचा मृत्यू झाला ते मृतदेह थेट पाण्यात फेकण्यात आले. तसेच उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सामान्य लोकांसाठी कोणतीही विशेष व्यवस्था केली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.