मुलींनो सावधान! सोशल मीडियावरुन मित्र बनवताय तर…

149

पोलिसांकडून वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करणा-या लोकांकडून सर्वाधिक बलात्कार करण्यात आल्याचं, उघड झालं आहे. त्यामुळे मुलींनो सोशल मीडियावर मित्र बनवताना काळजी घ्या.

धक्कादायक माहिती समोर

पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात गेल्या तीन वर्षांत मित्र, प्रियकर तसचे सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या तरुणांकडून सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना सतर्क राहण्याच्या सूचनाही पोलिसांकडून करण्यात आल्या. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी सहआयुक्त मिलिंद भारांबे, विश्वास नांगरे पाटील, निकेत कौशिक राजकुमार व्हटकर यांच्यासह पाचही अपर पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस उपायुक्त हजर होते. यावेळी हेमंत नगराळे यांनी गुन्ह्याचा लेखजोखा मांडला.

( हेही वाचा: बापरे! राज्यात इतक्या शाळा ‘अनधिकृत’! अशी ओळखा अनधिकृत शाळा)

तरुणी विकृत वासनेचे शिकार

गेल्या वर्षभरात मुंबईत बलात्काराच्या 888 घटनांची नोंद झाली. यामध्ये 534 गुन्हे हे अल्पवयीन मुलींशी संबंधित होते. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षात मित्र, प्रियकर तसेच सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या व्यक्तीकडून सर्वाधिक मुली, तरुणी विकृत वासनेचे शिकार ठरत असल्याचे समोर आहे. गेल्यावर्षी 299 अल्पवयीन मुलींसह 271 तरुणी आरोपींच्या जाळ्यात अडकल्या. यामध्ये लग्नाचे आमिष दाखवत, अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाकाळात सोशल मीडियाचा वावर वाढला. त्यामुळे या गुन्ह्यांत वाढ झाल्याचा अंदाजही पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.