गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे दुचारी, चारचाकी असे कोणतेही वाहन चालवताना नियमांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. नियमांचे पालन केल्यास हे प्रमाण निश्चितच कमी होईल. याच पार्श्वभूमीवर मुंबईत चारचारी वाहनांमधील सहप्रवाशांना सीटबेल्टसक्ती करण्यात आली. परंतु असे ट्रॅफिकचे नियम आहेत जे आजही लोकांना माहिती नाहीत याविषयी जाणून घेऊयात…
( हेही वाचा : विराट कोहलीने जिंकले सर्वांचे मन; भारताच्या विजयानंतर बांगलादेशच्या हॉलमध्ये गेला अन् घडले असे…)
तुम्हाला माहिती आहे का? चप्पल घालून गाडी चालवणे योग्य की अयोग्य हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत आता वाहतूक मंत्रालय आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिले आहे. तुम्ही अनेक ठिकाणी वाचले असेल की चप्पल घालून कार चालवल्यास १००० किंवा २००० हजार रुपये दंड आकारला जातो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. अर्ध्या बाहीचा शर्ट, लुंगी किंवा बनियान घालून गाडी चालवल्यास, अतिरिक्त प्रकाश नसलेल्या कार आणि कारमध्ये अस्वच्छ काच असल्यास, चप्पल घालून गाडी चालवली तर कोणताही दंड आकारला जाणार नाही, असे गडकरींनी ट्वीट करत स्पष्ट केले आहे. नवीन मोटार वाहन कायद्यात या कारणास्तव दंडाची तरतूद नाही.
अफवाहों से सावधान…!#TrafficFines #MotorVehicleAct pic.twitter.com/vd2gLu72i3
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) September 25, 2019
तुम्ही अफवांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये असेही वाहतूक मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. प्रवासादरम्यान, सीटबेल्ट सक्ती, हेल्मेट घालणे, ट्रॅफिकचे नियम आणि वेग मर्यादा लक्षात ठेवणे यासारख्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
Join Our WhatsApp Community