सिंगल पासिंगची (Central Railway) घटना घडल्यानंतर मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी सँडहर्स्ट रोड ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रगती एक्सप्रेस ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी मुरलीधर शर्मा पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये कर्तव्यावर होते. यादरम्यान सीएसएमटीकडे लोकल घेऊन जात असताना त्यांच्याकडून कुर्ला स्थानकात सिग्नल पासिंगची घटना घडली.
घटना घडल्यानंतर त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू होती. चौकशी सुरू असल्याच्या भीतीपोटी काही वेळातच सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान वेगाने येणाऱ्या प्रगती एक्सप्रेससमोर येत आत्महत्या केली होती. त्यानंतर शनिवारी दुपारी शर्मा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, मात्र त्यांचे नातेवाईक येणार असल्याने अंत्यसंस्काराची वेळ ५ ठेवण्यात आली होती. शर्मा यांच्या अंत्यसंस्काराचे कारण देत मुख्य आणि हार्बरमार्गावरील शेकडो मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिला. शिवाय इतर मोटरमन शर्मा यांच्या अंत्यसंस्काराला गेले असल्याने उपलब्ध नव्हते. यामुळे मुख्य-हार्बर मार्गावरील १०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द झालेल्या आहेत.
(हेही वाचा – CM Eknath Shinde यांच्याकडून सरवणकर, शिरसाट यांची विचारपूस )
मोटरमन शर्मा यांच्या अपघातीमृत्यूनंतर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (सीआरएमएस) मुंबई विभागाने मध्य रेल्वेला दोषी ठरवले. मोटरमन अतिरिक्त काम करतात. मात्र एखाद्या वेळी चुकून सिग्नल ओलांडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होते. मुळात अशा घटनांना अन्य बाबीही जबाबदार असतात. मोटरमनच्या जागा रिक्त असल्याने मोटरमनवर अतिरिक्त काम करावे लागत आहे, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community