- प्रतिनिधी
जल विद्युत निर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि विविध सात वीज कंपन्यांमध्ये मंगळवारी (३ सप्टेंबर) सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे राज्यात ४० हजार ८७० मेगावॅट वीज निर्मिती होणार असून तयार होणार असून त्यासाठी राज्यात २ लाख १४ हजार कोटींची गुंतवणूक आणि ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन करण्याच्या उद्देशास या करारामुळे गती मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितले.
मंगळवारी (३ सप्टेंबर) सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य सरकार आणि एनटीपीसी, वेलस्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रीन्यू हायड्रो पावर, टीएचडीसी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले की, राज्यात ४६ हजार मेगावॉट ऊर्जा निर्मिती होत असून या कराराच्या माध्यमातून अधिकची ४० हजार ८७० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. या करारांमुळे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे राज्याचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यास गती प्राप्त होणार आहे.
(हेही वाचा – मंत्रालयातील कामकाज ई ऑफिसद्वारे होणार; CM Eknath Shinde यांची माहिती)
नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ऊर्जा शाश्वत पद्धतीने निर्माण करू शकतो. राज्यात पश्चिम घाटात विशेष जैवविविधता आहे. तेथे अनेक ठिकाणी शीतगृहांसाठी ऊर्जेचा वापर होणार आहे. शासकीय आणि खासगी क्षेत्राने उत्सुकतेने हे करार पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले आहे. यामुळे राज्यासाठी शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस सहकार्य लाभणार असल्याचेही फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदा प्रकल्प आणि विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.दीपक कपूर यांनी सात कंपन्यांअंतर्गत होणाऱ्या करारासंदर्भात अधिक माहिती दिली. नॅशनल थर्मल पॉवर कंपनीअंतर्गत ९ हजार ७८ काटी इतकी गुंतवणूक होणार असून १ हजार ४०० रोजगार निर्मिती आणि १ हजार ८०० मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. वेल्सपन न्यु एनर्जी कंपनीकडून ५ हजार कोटी गुंतवणूक होणार असून १ हजार ५०० रोजगार निर्मिती आणि एक हजार २०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – ST Bus Strike : एसटीचा संप सुरूच; बैठकीतील आवाहनांना प्रतिसाद नाही)
कंपनी | गुंतवणूक | रोजगार | वीजनिर्मिती |
एनएचपीसी | ४४ हजार १०० कोटी | ७ हजार ३५० | ७ हजार ३५९ मेगावॉट |
रिन्यु हायड्रो पावर लिमिटेड | १३ हजार १०० कोटी | ५ हजार | २ हजार ६०० मेगावॉट |
टेहेरी हायड्रो डेव्हलपमेंट कार्पोरेशन | ३३ हजार ६२२ कोटी | ६ हजार ३०० | ६ हजार ७९० मेगावॉट |
टोरन्ट पावर लिमिटेड | २८ हजार कोटी | ५ हजार | ६०० मेगावॉट |
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड | ५४ हजार ४५० कोटी | ३० हजार | ९ हजार ९०० मेगावॉट |
हेही पहा –
Join Our WhatsApp Community