- विशेष प्रतिनिधी, मुंबई
लोअर परळ येथील सिताराम मिल कंपाउंडमधील मुंबई महानगरपालिकेच्या भाड्याची इमारत धोकादायक ठरल्यामुळे या इमारतीतून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) बाहेर पडावे असून सध्या येथीलच लोढा एस. आर. ए. प्रकल्प जवळील आरक्षित इमारतीत दिलेल्या तात्पुरत्या व तुटपुंज्या जागेत ही संपूर्ण संस्था कार्यरत आहे. या इमारतीत एकंदर ३५०० चौ. फुटामध्ये संपूर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कारभार चालवावा लागत आहे. लोअर परेल आग्रीपाडा, लालबाग, भायखळा या दक्षिण मुंबईतील मराठी बहुल वस्तीतील विद्यार्थ्यांची प्रशिक्षणाची गरज व दरवर्षी प्रवेशासाठी होणारी वाढती मागणी लक्षात घेता ‘ई’ विभागातील उर्दु भवन उभारण्यात येणाऱ्या भायखळा/नागपाडा येथील जागा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वितरीत करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक आणि भाजपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट लोअर परेल यांनी केले आहे. (Urdu Bhavan)
लोअर परेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही सिताराम मिल कंपाउंड लोअर परेल येथे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारतीत तळमजल्यावर भाड्याने सन १९९८ पासून कार्यरत होती. या संस्थेस कायमस्वरूपी जागा देण्याचे महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केले होते. सिताराम मिल कंपाउंड लोअर परेल येथील मुंबई महानगरपालिकेच्या भाड्याची इमारत धोकादायक ठरल्यामुळे या इमारतीतून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला बाहेर पडावे लागले. महापालिकेने त्यांना लोअर परेल येथील जे.बी. बोरीचा मार्ग, प्लॉट १०, शाळेची इमारत, लोढा एस. आर. ए. प्रकल्प जवळील आरक्षित इमारतीत दिलेल्या तात्पुरत्या व तुटपुंज्या जागेत ही संपूर्ण संस्था कार्यरत आहे. याठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ताब्यात केवळ तिसरा व चौथा मजला आहे. (Urdu Bhavan)
(हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या काळात आयटीआयची जागा दिली Urdu Bhavan साठी; भाजपाची आयुक्तांकडे ‘ही’ मागणी)
याच इमारतीतील पहिला व दुसरा मजला महापालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळेस दिलेला आहे. येथे सर्व चार मजले देण्यासाठी प्राचार्य, आयटीआय, लोअर यांनी प्रयत्न केले होते. पण त्यास यश आले नाही. या इमारतीत एकंदर ३५०० चौ. फुटामध्ये संपूर्ण आयआयटीचा कारभार चालवावा लागत आहे. या संस्थेत वायरमन, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रोनिक्स, आय. टी., कॉम्प्युटर, इंटीरियर डिझाईन, फॅशन टेक्नॉलॉजी व बेसिक कॉस्मेटोलॉजी आदी आठ विविध ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या या संस्थेत ४२४ प्रशिक्षणार्थीना तीन पाळ्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेच्या विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव जागेअभावी अंमलात आणता आला नाही. या संस्थेत अद्ययावत नवीन रोबोटिक्स सारखे १५ ट्रेडस सुरू करणे शक्य झालेले नाही. सध्याच्या अपुऱ्या जागेमुळे विद्यार्थ्यांना वर्गखोली आणि प्रयोगशाळा एकाच ठिकाणी एकाच वर्गखोलीत घ्यावी लागते. प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसण्यास जागा नाही. येथे शैक्षणिक संस्थेस आवश्यक ग्रंथालय व अन्य शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. (Urdu Bhavan)
आज भारत देशात ६५ टक्के युवक आहेत. आणि आज युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची गरज आहे. अशावेळी उपलब्ध भूखंडावर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र रद्द करणे हे योग्य ठरणार नाही. लोअर परेल आग्रीपाडा, लालबाग, भायखळा या मध्य मुंबईतील मराठी बहुल वस्तीतील विद्यार्थ्यांची प्रशिक्षणाची गरज व दरवर्षी प्रवेशासाठी होणारी वाढती मागणी लक्षात घेता ‘ई’ विभागातील भायखळा सी. एस. क्रमांक १९०८ हा भूखंड औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोअर परेल यांनाच पुन्हा वितरीत करण्यात यावी असे शिरसाट यांनी म्हटले आहे. (Urdu Bhavan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community