गुजरातमधील जुनागडमध्ये भडकाऊ भाषण करणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला (Mufti Salman Azhari) अखेर गुजरात एटीएसने घाटकोपर येथूल ताब्यात घेतले. त्याच्यावरील अटकेमुळे घाटकोपरमध्ये हजारोंच्या संख्येने मुसलमान जमा रविवार, ४ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा जमा झाले होते. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी त्यांनी ट्रान्झिट रिमांड घेऊन रातोरात गुजरातमध्ये नेला.
हिन्दुओ को खुलेआम धमकी..
“आज कुत्तों का दौर है, कल हमारा वक़्त आएगा।”
कट्टरपंथी मुस्लिम नेता मुफ़्ती सलमान अजहरी का जहरीला बयान ! pic.twitter.com/llAL0sNg0i
— Panchjanya (@epanchjanya) February 3, 2024
अजहरीचे आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल
जुनागडमध्ये मुफ्ती सलमान अजहरी (Mufti Salman Azhari) याने भडकाऊ भाषण देताना ‘काही वेळ शांतता आहे आणि मग आवाज येईल, आज कुत्र्यांची वेळ आहे, उद्या आमची पाळी येईल’, असे वक्तव्य करत त्याने हिंदूंना कुत्रा म्हटले. त्याच्या भाषणाची क्लिप व्हायरल झाल्यावर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात एटीएसने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला मुंबईतून अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी मलिक आणि हबीब या आयोजकांनाही अटक केली आहे.
(हेही वाचा Muslim : हिंदूंना कुत्रा म्हणणाऱ्या मुफ्ती सलमान अझरीचा पोलीस कारवाईनंतर खुलासा )
पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
जेव्हा मौलाना मुफ्ती सलमान अजहरी (Mufti Salman Azhari) यांना अटक केली त्यावेळी रविवारी रात्री घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर अजहरीच्या समर्थकांचा मोठा जमाव जमल्याचे पाहायला मिळाले. त्याची पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरु होती. पोलिसांनी त्यावेळी सौम्य लाठीचार्ज केला.
Join Our WhatsApp Community