श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी (Shri Krishna Janmabhoomi) २८ ते ३० मार्च या कालावधीत मेलबर्नमध्ये (Melbourne) एक भव्य परिसंवाद आयोजित केला जाईल. महासंवादात बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pandit Dhirendra Krishna Shastri) यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाईल. जगभरातील सनातनी हिंदू आणि अनिवासी भारतीय यांना महासंवादाच्या माध्यमातून जागरूक केले जाईल, अशी माहिती श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी केली.
(हेही वाचा – न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा कामकाजावर परिणाम ; राज्य सरकारला कार्यवाहीचे High Court चे निर्देश)
विदेशात प्रथमच श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीविषयी (mathura encroachment) जागृती होणार आहे. या चळवळीची सुरुवात स्वाक्षरी मोहिमेने झाला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी स्वाक्षरी मोहिमेत आतापर्यंत साडेतीन कोटींहून जास्त हिंदूंनी भाग घेतला आहे. जगभरातील अनिवासी भारतियांना या चळवळीशी जोडण्याची तयारी करण्यात आली आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती (Shri Krishna Janmabhoomi) न्यासाचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, १४ मार्चनंतर रामलल्लाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येपासून (ayodhya ram mandir) हे आंदोलन चालू होईल. यानंतर भगवान श्रीकृष्णाचे भक्त जागतिक स्तरावर एकत्र येतील. मेलबर्ननंतर दक्षिण आफ्रिका, केनिया, मॉरिशस, मलेशिया आणि अमेरिका येथे स्वाक्षरी मोहिमा आणि जागरूकता मोहिमा आयोजित केल्या जातील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community