
द्रमुक (DMK) खासदार ए राजा (A. Raja) यांनी पुन्हा एकदा हिंदूंविरोधीत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना द्रमुकचे धोतर घालताच टीळा आणि सर्व हिंदू (Hindu) धार्मिक चिन्ह फेकून टाका, असे सांगितले. तसेच द्रमुक कार्यकर्त्यांनी ‘संघी’पेक्षा वेगळे दिसण्याचे आवाहन केले. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला. याआधी त्यांनी हिंदू धर्म (Hinduism) हा भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे, असे वादग्रस्त विधान केले होते.
( हेही वाचा : Mahabaleshwar मध्ये २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन; पर्यटकांना घेता येणार ‘या’ विविध कार्यक्रमांचा आनंद)
ते म्हणाले (A. Raja) की, “जर तुम्ही ‘पोट्टू’ (टिकली\टिळा\ धार्मिक चिन्ह) वापरत असाल आणि संघीही तेच करत असेल, तर दोघांमध्ये फरक दिसणे कठीण आहे. म्हणूनच तुमचा ज्या देवावर विश्वास आहे. त्या देवाचीच तुम्ही पूजा करा. जर तुमचे पालक तुमच्या कपाळावर पवित्र राख/टिळा लावत असतील तर तुम्हीही ते लावावे. मात्र तुम्ही द्रमुकचे (Dravida Munnetra Kazhagam) धोतर घालताच ही हिंदू (Hindu) चिन्हे दूर करावीत.” (DMK)
द्रमुकच्या (DMK) एका कार्यक्रमात धार्मिक चिन्हे न घालण्यावर बोलताना ए राजा म्हणाले, “जर आपल्याला देवाची गरज असेल तर आपल्याकडे तो आहे. आपण अशा देवाच्या विरोधात नाही आहोत जो प्रेम आणि दयाळूपणासाठी ओळखला जातो. जो निष्पाप लोकांच्या हृदयात राहतो किंवा गरिबांच्या आनंदात सतत आपल्याला दिसतो.” असेही ए राजा (A. Raja) म्हणाले. याआधीही ए राजा (A. Raja) यांनी हिंदुत्वाविरोधात (Hindutva) वादग्रस्त विधाने केली होती. (Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community