मध्य प्रदेशच्या श्योमपुर जिल्ह्यामध्ये शनिवारी, (१ जून) सीप नदीमध्ये एक बोट उलटून ५ लहान मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोट ८ जणांना घेऊन जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. (MP Boat Capsized)
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जोराच्या वादळामुळे बोट पलटली. अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितलं की, बोटीमध्ये एकूण ११ लोक होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक घटनास्थळी आले होते. चार जणांना वाचवण्यात आले आहे. ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह हे देखील घटनास्थळी पोहोचले होते. जिल्हा मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. यात चार लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. सात मृतांपैकी ४ ते १५ वर्षे वयाच्या पाच जणांना मृत्यू झालाय, तर एक व्यक्ती ३५ वर्षांची तर महिला ३० वर्षांची आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत, पोलीस अधीक्षक अभिषेक आनंद यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. (MP Boat Capsized)
श्योपुर की सीप नदी में नाव पलटने से हुई दुर्घटना में कई अनमोल जिंदगियों के असामयिक निधन से अत्यधिक पीड़ा हुई।
हादसे के तत्काल बाद मौके पर कलेक्टर व एसपी पहुंच गए तथा शासन की ओर से मंत्री श्री @PradhumanGwl जी भी घटना स्थल पर पहुँच रहे हैं। SDRF की टीम घटनास्थल पर पहुंचकर राहत…
— Dr Mohan Yadav (Modi Ka Parivar) (@DrMohanYadav51) June 1, 2024
एसडीआरएफच्या पथकाची मदत
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना ४-४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मिडिया ‘X’वर माहिती दिली आहे. मोहन यादव म्हणाले की, श्योमपुरच्या सीप नदीमध्ये बोट पलटून अपघात झाला आहे. यात झालेल्या जीवितहानीमुळे मी दु:खी आहे. घटनेनंतर तात्काळ जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी पोहोचले होते. एसडीआरएफचे पथक पोहोचून बचावकार्य सुरू झाले होते, पण या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दु:खामध्ये माझ्या सहवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community